'लेक लाडकी योजना'

महाराष्ट्र शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना' सुरू केली आहे. यामध्ये मुलगी जन्माला येताच तिला आर्थिक मदत केली जाते.

लाभ कोणाला मिळणार?

या योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

1,00,000 रुपये मिळतील

मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत 5 हप्त्यांमध्ये सरकार आर्थिक मदत करेल. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेंतर्गत मुलीला एकूण 1,01,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचा मुख्य हेतू पात्र कुटुंबांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे. या कार्यक्रमाची उद्दिष्टे महिलांची संख्या वाढवणे, त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देणे आणि बालविवाह आणि कुपोषण समाप्त करणे हे आहेत.

ही आहे अट

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करणे बंधनकारक आहे. १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

कुठे अर्ज करावा ?

कृपया जाणून घ्या की सरकारने नुकतीच ही योजना जाहीर केली आहे. लवकरच या योजनेशी संबंधित अधिकृत वेबसाइट सरकारकडून प्रसिद्ध केली जाईल. सध्या तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल.

'लेक लाडकी योजना'

'लेक लाडकी योजने'च्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता:

Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजना (SSY)

'सुकन्या समृद्धी योजने'च्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता: