Dearness Allowance Hike: महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सण भेट, महागाई भत्त्यात २% वाढ

Dearness Allowance Hike

Table of Contents

Maharashtra Government: Dearness Allowance Hike

राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होऊन तो 44 टक्के इतका होणार आहे.

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट (Diwali 2023) दिली असून महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ (Maharashtra Govt Increase Dearness Allowance) करण्याचा निर्णय घेणार आहे. महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात २% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

याआधी जून महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता त्यात दोन टक्क्यांची वाढ करून तो 44 टक्के इतका करण्यात आला आहे. या संबंधित निर्णय हा बुबुधवार म्हणजे दिनांक 08 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra cabinet Meeting) होणार असल्याची माहिती आहे.

या आधी जून महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. साधारणपणे वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 42 टक्क्यांवरुन 44 टक्के करण्यात आलेला आहे.

Dearness Allowance Hike for Central Government Employees केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

केंद्र सरकारने दिवाळी गोड करण्यासाठी केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. त्यानंतर त्यांना मिळणारा डीए (Dearness Allowance) आता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकार वर्षातून दोनदा DA मध्ये सुधारणा करतं. ज्याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून दिला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे, देशात सुमारे 52 लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात आणि 60 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना सरकारच्या या मोठ्या निर्णयाचा फायदा होणार आहे.

कर्मचार्‍यांच्या पगाराचा डीए हा महत्त्वाचा भाग असून त्यात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांना मिळणाऱ्या पगारावर होतो. पण ते कसे ठरवले जाते हे तुम्हाला माहिती आहे का?  महागाईचा दर लक्षात घेऊन सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. यासाठी CPI-IW डेटा मानक मानला जातो.

अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही BankBazar वेबसाइटच्या खालील लिंकला भेट देऊ शकता, जिथे महागाई भत्त्याची calculations  दिले आहेत.

You can also read:

  1. Guaranteed Confirmed Tatkal Ticket: Tricks for a 100% Success Rate
  2. Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजना (SSY) – व्याज दर 2023, कर लाभ, पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील
  3. Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी योजना’ काय आहे? कुणाला मिळणार लाभ? एका क्लिकवर माहिती मिळवा..
  4. Big Update on PM Vishwakarma Yojana

2 thoughts on “Dearness Allowance Hike: महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सण भेट, महागाई भत्त्यात २% वाढ”

Leave a comment

Tips To Get Sound Sleep! Food to Eat During Winter For a Good Health! India Vs South Africa ODI Head to Head Stats! Must Watch.. Top Fastest Birds in the World! Must Watch!! Don’t Miss Out! Cook These 5 Veggies for Maximum Health Benefits