Sangli Rain News : सांगली जिल्ह्यात 08 नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाची हजेरी; ऐन दिवाळीत पाऊस, लाखोंचे नुकसान..

Sangli Rain News

Table of Contents

Sangli Rain News

सांगली शहर व परिसरात तसेच जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. सलग तीन तास झालेल्या या पावसाने दिवाळीसाठी सजलेल्या व्यापारी पेठात पूर यावा, तसे पाणी साचले. त्यामुळे स्टॉलधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र होते. कालपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण कायम आहे.

द्राक्षबागांना फटका

याचा फटका द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सांगली जिल्ह्यात १ लाख २५ हजार एकरावर द्राक्षबागा आहेत. पावसाने फुलोरा अवस्थेत असलेल्या बागात डाऊनी व घडकूजीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गुडघ्याएवढे पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांचे लाखोंचे नुकसान

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह फेरीवाले, व्यापारी यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुळात सांगली महापालिकेने आंबेडकर क्रीडांगणावर स्टॉल लावण्याची व्यवस्था केली आहे. मात्र प्रचंड पावसाने विक्रेत्यांना साहित्य पाण्यातून हलवावे लागले. त्याचा फटका विक्रेत्यांना बसला.

ऐन दिवाळीत पाऊस

Sangli Rain News: कालपासून बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र प्रचंड पावसामुळे या सर्व खरेदीवर विरजण पडले. शहरातील (Sangli City) प्रसिध्द मारुती रस्त्यावर पावसाने प्रचंड पाणी साठल्याने दिवाळीसाठी सजलेल्या मुख्य व्यापारी पेठेची दैना उडाली. व्यापाऱ्यांच्या दुकानातही पाणी घुसले. तात्पुरते उभारलेले मंडपासह स्टॉलचे नुकसान झाले. स्टेशन चौक, कापड पेठ, विश्रामबाग, विजयनगर येथील बाजारपेठेत ऐन दिवाळीत विक्रेत्यांचे हाल झाल्याचे चित्र होते. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरात पाण्याचे लोट वाहत होते.

पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे

Sangli Rain Update: IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून आले. दिवाळीच्या मोसमातील या अनपेक्षित पावसामुळे लोक खूप चिंतेत आहेत.

Low Pressure Belt on the Arabian Sea अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा

Low Pressure Belt on Arabian Sea या कमी दाबाच्या यंत्रणेच्या उपस्थितीमुळे पुढील सहा ते सात दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज आहे. हवामानाच्या नमुन्यातील हा बदल म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या सहामाहीत नेहमीपेक्षा कमी थंडीची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या विखुरलेल्या पावसाचे अंदाज जारी केले आहेत. हा पावसाळी स्पेल मंगळवार ते शनिवार पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, 7 ते 11 नोव्हेंबर या तारखांचा समावेश आहे.

याशिवाय, आयएमडीच्या मुंबईस्थित प्रादेशिक हवामान केंद्राने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसाठी पुढील तीन दिवस, 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीसाठी जिल्हास्तरीय पिवळा अलर्ट जारी केला आहे. यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत पाऊस

मुंबईत बुधवारी सायंकाळी हलका पाऊस झाला, त्यामुळे वातावरण हलकेच थंड झाले होते. मुंबईत काही ठिकाणी, मुख्यत: मुख्य मुंबईत पाऊस पडला. उपनगरीय भागात पाऊस पडला नाही, त्यामुळे दमट वातावरणापासून मुंबईकर सुटलेले नाहीत. पावसानंतर हवेतील आर्द्रता वाढली आहे

आपण हे देखील वाचू शकता:

  1. ICC ODI Player Ranking: शुभमन गिल, मोहम्मद सिराज यांनी आयसीसी क्रमवारीत रचला इतिहास! २ वर्षांनंतर बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर..
  2. Dearness Allowance Hike: महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सण भेट, महागाई भत्त्यात २% वाढ
  3. Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी योजना’ काय आहे? कुणाला मिळणार लाभ? एका क्लिकवर माहिती मिळवा..
  4. Konkan Railway Diwali Special Train कोकण रेल्वे दिवाळी स्पेशल ट्रेन: दिवाळी मध्ये कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! कोकणातील प्रवाशांसाठी विशेष ट्रेन!

Leave a comment

Tips To Get Sound Sleep! Food to Eat During Winter For a Good Health! India Vs South Africa ODI Head to Head Stats! Must Watch.. Top Fastest Birds in the World! Must Watch!! Don’t Miss Out! Cook These 5 Veggies for Maximum Health Benefits